एन.
एस. एस. विभाग - वार्षिक अहवाल 2021-22
सन 2021-22 या शौक्षणिक वर्षात पुढील प्रमाणे एन. एस. एस. उपक्रम राबनिण्यात
आले.
Ø
दि. २२ ऑगस्ट २०२१
रोजी ‘आझादी
का अमृत मोहोत्सव’ अंतर्गत दत्तक गाव मौजे
कुशी या ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात आली त्याच प्रमाणे सॅनिटायझर वितरण करण्यात आले या वेळी कुशी ग्रामस्त यांनी सहभागी
होऊन सहकार्य केले.
Ø
‘आझादी का अमृत मोहोत्सव’ पर दि.
२६ नोहेंबर २०२१ रोजी ‘संविधान दिन’ साजरा
करण्यात आला यासाठी महारॅलीचे आयोजन
अरण्यात आले यामध्ये एन. एस. एस. स्वयम सेवक
व कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.
Ø
‘आझादी का अमृत मोहोत्सव’ पर युवक बिरादरी मार्फत
राजस्तरीय अभिरूप संसद ही स्पर्धा MIT,
College, Pune येथे घेण्यात आली. यामध्ये महाविद्यालयाचा पाचवा
क्रमांक आला.
Ø
‘माझी वसुंधरा’
अंतर्गत ‘आझादी का अमृत मोहोत्सव’ पर मौजे म्हाते खुर्द येथे श्रमसंस्कार
शिबीर काळात वृक्षारोपण करण्यात आले यासाठी मा. प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ
यांनी मार्गदर्शन केले तसेच गावाचे सरपंच मा. आर. जे. दळवी सर उपस्थित होते
Ø
‘आझादी का अमृत मोहोत्सव’ पर दि. १६ मार्च रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात
आले. यामध्ये १०२ स्वयमसेवकांनी रक्तदान केले. शिबिराचे आयोजन एल. बी. एस. कॉलेज व
बालाजी ब्लड बँक मार्फत करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ.
आर. व्ही. शेजवळ होते.
Ø
दि.
१८ मे २०२२ रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेची जिल्हा आढावा
बैठक बापूजी साळुंखे कॉलेज येथे घेण्यात आली. यासाठी शिवाजी विद्यापीठाचे समन्वयक
मा. प्रा. अभय जायभाय यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सातारा जिल्यातून ४५
कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.
Ø
प्रा. एन. व्ही. शिंदे
सर कार्यक्रम अधिकारी यांना उच्च शिक्षण मंत्री मा उदय सामंत यांच्या हस्ते
‘उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी’ हा राज्यस्तरीय पुरस्कार दि. २५ एप्रिल २०२२ रोजी प्राप्त झाला.
वरील सर्व उपक्रम यशस्वीरीत्या पार पडलेली असून यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर व्ही शेजवळ यांचे बहुमोल
मार्गदर्शन लाभले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातील प्रा. डॉ. पी. आर.
जाधव (कार्यक्रम अधिकारी), प्रा. डी. व्ही. रूपनवर (कार्यक्रम अधिकारी), तसेच प्रा. डॉ. मनोज जाधव (कार्यक्रम अधिकारी),
प्रा. रमेश मदने, प्रा. आर. ए. नलवडे यांचे सहकार्य लाभले.
2. NSS Camp 2021-22 - Mhate Kh.
प्रा. डॉ. पी. आर. जाधव कार्यक्रम अधिकारी